Sunday, 15 July 2012

औरंगाबाद महानगरपालिकेच्या सुरक्षितते साठी " ई-कैश बुकचा उपयोग " करण्याची मागणी.

औरंगाबाद.  दिनांक.   २९ जून,२०१२.
विज्ञान आणि प्रौद्योगिकी समावेशित
भ्रष्टाचारमुक्त भारत निर्माण आंदोलन.
[ गैर राजनीतिक व गैर व्यापारिक ज्ञान-विज्ञान विकास समूह ]
( समुहाचे पंजीयन प्रतीक्षित )
{ संयोजक : चंद्रकांत वाजपेयी. जेष्ठ नागरिक एवं सामाजिक कार्यकर्ता }
मोबा. क्रमांक : +९१ ९७३०५००५०६.  ई-मेल : chandrakantvjp@gmail.com   ल १/५, कासलीवाल विश्व, उल्कानगरी, पार्वतीनगर, गारखेडा, औरंगाबाद. ४३१००५. 

पत्र क्र.:विप्रौस भ्रमुनिआ / औबाद / 01 / ०००१                              दिनांक : २९ - ०६ - २०१२ 
प्रतिष्ठेत,     
मा.  श्रीमती अनिता घोडेले. ( महापौर ) मो.+९१९४२३१४८८४५  व  +९१९४२२७०७५५० .   महानगरपालिका, औरंगाबाद  ( महाराष्ट्र )    

मान्यवर श्री विकास जैन [सभापती]  +९१९३७२८९९९९९.
 महानगरपालिका, औरंगाबाद  ( महाराष्ट्र )                                                                                             
डॉ. पुरुषोत्तम भापकर साहेब, ( आयुक्त )
आयुक्त कार्यालय,  महानगरपालिका.
          औरंगाबाद  ( महाराष्ट्र )                   
                                     - - - :विषय:---
    औरंगाबाद महानगरपालिकेच्या सुरक्षितते साठी " ई-कैश बुकचा उपयोग " करण्याची मागणी.  

संदर्भ: महानगरपालिका औरंगाबादचे कैशबुक हरविले असून शोध चालू असणे आणि त्या साठी पोलीस फिर्याद करणे विषयक बातम्यांची वर्तमान पत्रातून प्रसिद्धी 
दि.२९ जून २०१२.                                                                                                                            
(१)"महापालिकेचे कैशबुक गायब" शीर्षकांतर्गत प्रसिद्ध बातमी."दिव्य मराठी" दिव्यसिटी औ.बाद. पान-३
  (२)"लेखा विभागातील कैशबुकचा शोध सुरु."शीर्षकांतर्गत प्रसिद्ध बातमी"महाराष्ट्रटाइम्स"  औ.बाद. पान-२.
 (३) गेल्या वर्षी केंद्र शासन आणि टीम अण्णा (लोकपाल बिल संयुक्त मसौदा समिती) यांना "ई- मेल केलेले  "आणि  दिव्य मराठीस प्रसिद्धी साठी प्रेषित केलेले विनंती पत्र दिनांक  १९/०६/ २०११.   यथावश्यकता या पत्राची लिंक खाली नमूद केली आहे.
पत्रात सर्व शासकीय  गैरशासकीय प्रतिष्ठानास  ई-कैशबुक अनिवार्यत:  संचालित करणे विषयक निवेदन केले आहे.

मान्यवर,
              वरील संदर्भातून औरंगाबाद महानगरपालिकेची कैशबुक हरविल्याची / पळविली गेल्याची  दु:खद बातमी वाचण्यात आली.  वाईट वाटले.   
कांही वर्षापासून हे अनुभवास येते कि  " देशभरात विभिन्न सरकारी आणि गैरसरकारी प्रतिष्ठानातून  नागरिकांच्या पैशाचा अपव्यय किंवा त्यांच्या धनाची
लबाडी करण्याचे धोरण ज्याला "भ्रष्टाचार" म्हटले जाते सर्रास चालू आहे. इतकेच नव्हे तर या  प्रतिष्ठानातील  भ्रष्टाचाराचे लेखी कागदी पुरावे नष्ट करणे किंवा पळविणे देखील कांही भ्रष्ट तत्व करताहेत.   देश रक्षणार्थ या कृतींना पूर्ण पणे बंदी घालणे अतिशय आवश्यक व गरजेचे झाले असल्यानेच वरील संदर्भ क्रमांक तीन (३) मध्ये उल्लेख केल्या प्रमाणे  " ई-कैशबुक " संचालन करणे  तसेच त्या पत्रातील अन्य व्यवस्थांचे स्थापन देशभरात करणे विषयक निवेदन अधो-उल्लेखित प्रेषकाने  शासनाला, तसेच अनेक मान्यवरांना आणि माध्यमाना या पूर्वी केले आहे.
                           मान्यवर महापौर सा., सभापती साहेब आणि माननीय आयुक्त साहेबांना आज विनम्र मागणी करीत आहे कि कृपाकरून "औरंगाबाद महानगर पालिकेत ताबडतोब  " ई-कॅशबुक संचालन करणे आणि दररोजचे प्रत्येक आर्थिक व्यवहाराचे अभिलेख विशिष्ट लेखावेबसाईटवर अपलोड करण्याचे व सार्वजनिक करण्याचे बंधनकारी धोरण  व्यवहारात आणण्याची सुरक्षित व्यवस्था करावी, अन्यथा शांतीपूर्ण अहिंसात्मक पद्धतीनेच वरील व्यवस्था स्थापित  करविण्याचे विधीमान्य प्रयोग करण्यास आम्ही बाध्य राहू ज्याची संपूर्ण जवाबदारी औरंगाबाद  महानगरपालिकेची राहील. " 
आपण त्रि-महानुभावांना पुन: एकदा वरील व्यवस्थांची अंमल बजावणी करावी अशी विनम्र विनंती करतो. विश्वास करतो कि आपल्या द्वारे वरील माध्यमातून नागरिकांच्या धनाची योग्य सुरक्षा आणि केवळ विकासकार्यात व नगरपालिकेच्या अत्यावश्यक सेवा पूर्तीसाठी नियमांतर्गत स्वीकृत खर्च पूर्णत: प्रामाणिकपणे करणे घडविले जाईल आणि असे इमानदार कर्तव्य निर्वाहनाचे चित्र सातत्याने औरंगाबादच्या नागरिकांना आढळेल, या साठी मी चंद्रकांत वाजपेयी आपला सदैव आभारी राहीन. आपले कडून वरील विषयावर ई-मेल द्वारे लवकरात लवकर माहिती मिळेल हे अपेक्षित आहे.  धन्यवाद.
शुभकांमनासह,
राष्ट्रहितार्थ प्रतिबद्ध,

चंद्रकांत वाजपेयी. [ जेष्ठ नागरिक आणि सामाजिक कार्यकर्ता ]
संयोजक '' विज्ञान आणि प्रौद्योगिकी समावेशित भ्रष्टाचारमुक्त भारत निर्माण आंदोलन. औरंगाबाद.
[ गैर राजनीतिक व गैर व्यापारिक ज्ञान-विज्ञान विकास समूह] ( समुहाचे पंजीयन प्रतीक्षित )
वरील कृतीच्या स्थापनेत सहयोग आणि मार्गदर्शनार्थ निवेदन प्रतिलिपी :--
१.आदरणीय अण्णा हजारे साहेब
 महाराष्ट्र राज्य कार्यालय  अण्णा हजारे प्रणीत                                             भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन न्यास, राळेगणसिद्धी   
तालुका: पारनेर, जिल्हा: अहमदनगर.महा.}             

२.जिल्हा अध्यक्ष श्री रामाराव बोर्डे साहेब 
   सचिव श्री एकनाथ जायभाये सा. आणि कार्यकर्ते,     
  जिल्हा समिती अण्णा हजारे प्रणीत  भ्रष्टाचार विरोधी 
   जन-आंदोलन न्यास, औरंगाबाद [ महाराष्ट्र ]

.  अध्यक्ष / सचिव एवं कार्यकर्ते. IAC
     इंडिया अगेन्स्ट करप्शन.  औरंगाबाद [ महाराष्ट्र ]

४ सर्व भ्रष्टाचार विरोधी संगठन, औरंगाबाद.                              
       { युथ अगेन्स्ट करप्शन. (YAC) स्वाभिमान भारत ट्रस्ट/ पतंजली योग समिती आणि श्री श्री रविशंकर महाराज कृत आर्ट ऑफ लिविंगचे कार्यकर्ते }
विश्वास आहे की आपले सर्वांचे / संगठनांचे स्नेह, सहयोग आणि  मार्गदर्शन मिळेल ज्या योगे तरुणांना तकनिकी कार्य व रोजगार वृद्धी करता येईल. तसेच नागरिकांच्या पैशाचे मोल  भ्रष्टाचारमुक्त सेवेतून अनुभवले जाईल. 
 पुन: धन्यवाद व शुभेच्छासह,

 चंद्रकांत वाजपेयी.  +९१९७३०५००५०६.
chandrakantvjp@gmail.com                                  
                                                    

No comments:

Post a Comment