Tuesday, 4 November 2014
पंतप्रधान श्री नरेन्द्र मोदी साहेब आणि चुनाव आयोगाने खाली नमूद लोकशिक्षणाची बाजू मांडावी |
रेडियो कार्यक्रम मन की बात मधून पंतप्रधान ।
या कार्यक्रमात श्री नरेंद्र मोदी साहेबांनी
खाली नमूद लोकशिक्षणाची बाजू मांडावी ।
या कार्यक्रमात श्री नरेंद्र मोदी साहेबांनी
खाली नमूद लोकशिक्षणाची बाजू मांडावी ।
मित्रांनो, आदरणीय पंतप्रधान श्री नरेंद्रभाई मोदी जी, हल्ली रेडियो वरील मन की बात या कार्यक्रमातून देशातल्या सर्व सामान्य माणसांशी संवाद साधताहेत ही चांगली बाब आहे,अर्थातच त्यांच्या या व्यवहारामुळे देशात शासनावर संपलेला विश्वास पुन: जागृत होत आहे ।
मला वाटते की पंतप्रधानांनी आणि चुनाव आयोगाने माझ्या द्वारे महाराष्ट्रातील निवडणुकांपूर्वी केलेली विनंती घटनेतील उल्लेखा प्रमाणे आदर्श उमेदवार कोणास म्हणावे ?हे रेडियो कार्यक्रम मन की बात आणि इतर माध्यमाच्या मदतीने सर्व सामान्य नागरिकांना सोप्या भाषेत समजवावी आणि पंतप्रधान साहेबांनी सुरु केलेल्या यां लोकशिक्षणाच्या स्वागत योग्य व्यवस्थेस प्रबळ करावे । याच प्रमाणे चुनाव आयोगाने देखील सातत्याने यां विषयाची पुरवणी करीत रहावे । या प्रयत्न्नांनी देशभरात श्री मोदी जी सारखेच विवेकशील जनप्रतिनिधी समोर येतील हे विशेष ।
काय वाचक देशाच्या कल्याणासाठी खालील विनंती स्वत: कडून पंतप्रधान श्री मोदिजी यांना करतील ?
मी विश्वास करतो कि माननीय वाचक खालील विषयाचे समर्थन करीत स्वत: तर्फे मोदी साहेबांना पत्र पाठवतील त्यासाठी मी त्यांचा सदैव आभारी राहीन । अग्रिम धन्यवाद ।
………… चंद्रकांत वाजपेयी.
Sunday, 5 October 2014
आदर्श उमेदवार कोणास म्हणावे ? पंतप्रधानांनीच हे मतदारांना समजावून सांगावे |
05 / 10 / 2014.



